नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया कंपनीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे चिदंबरम यांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी टाळण्यासाठी त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी बरेच प्रयत्न केले. न्यायालयीन कोठडीऐवजी चिदंबरम यांना ईडीच्या ताब्यात दिले जावे, असा सिब्बल यांचा प्रयत्न होता. मात्र, न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पी.चिदंबरम यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. 


न्यायालयाने हा निर्णय सुनावल्यानंतर चिदंबरम यांना तात्काल न्यायाधीशांकडे तिहार तुरुंगात आपल्याला वेस्टर्न टॉयलेट आणि अन्य सुविधा मिळाव्यात, अशी विनंती केली. न्यायालयाने त्यांची ही विनंती मान्य केली. तसेच चिदंबरम यांना त्यांची औषधेही पुरवण्यात येणार आहेत. 


न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर पत्रकारांच्या 'त्या' प्रश्नावर चिदंबरम म्हणाले....


तिहार तुरुंगात आर्थिक गुन्ह्यातील गुन्हेगारांना ठेवण्यात येणाऱ्या विभागातील सात क्रमांकाच्या कोठडीत चिदंबरम यांना ठेवले जाईल. याठिकाणी त्यांनी मागणी केल्याप्रमाणे एका स्वतंत्र खोलीत झोपण्यासाठी लाकडाचा बाकडा, टीव्ही, पुस्तकं, चश्मा आणि वेस्टर्न टॉयलेटची सुविधा असेल. तसेच चिदंबरम यांना जेवणात दाल, रोटी आणि भाजी खायला मिळेल. 


चिदंबरम यांना अटक झाली ही चांगली गोष्ट- इंद्राणी मुखर्जी


चिदंबरम यांना सध्या झेड प्लस सुरक्षा होती. ही गोष्ट लक्षात घेऊन तुरुंगातही त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाईल. त्यासाठी चिदंबरम यांच्या सुरक्षेसाठीही अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.