कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान `हे` पाऊल उचलण्याची शक्यता
काय म्हटलंय पाकिस्तानने...
नवी दिल्ली : भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी, सोमवारी जम्मू-काश्मीरबाबत भारताच्या निर्णयाला पाकिस्तान आंतराष्ट्रीय न्यायालय आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आव्हान देण्याबाबत सांगितलं. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर आणि अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर भारत सरकारच्या या निर्णयाचा बासित यांनी खेद व्यक्त केला आहे.
याबाबत बोलताना त्यांनी, 'तथाकथित जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाने आपला भयंकर चेहरा दाखवला' असल्याचं म्हटलं.
बासित यांनी, 'भारत अनुच्छेद ३७०ला अशाप्रकारे संसद आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार हटवू शकत नाही. अनुच्छेद ३७०ला केवळ काश्मीर संसदच हटवू शकत असल्याचं ते म्हणाले.
'पाकिस्तान टुने'ने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी, 'पाकिस्तान भारताच्या या निर्णयाला आंतराष्ट्रीय न्यायालयात आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद येथे आव्हान देऊ शकत असल्याचं म्हटलंय.
जम्मू-काश्मीरसाठी असलेलं अनुच्छेद ३७० रद्द करायला राज्यसभेत मंजुरी मिळाली. या विधेयकाच्या बाजूने १२५ विरुद्ध ६१ मतांनी मंजुरी मिळाली. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे कलम ३७० सोबतच कलम ३५ अ देखील रद्द करण्यात आलं आहे.