इस्लामाबाद : पाकिस्तानी सैन्य कुठल्याही प्रकारचा हल्ला झेलण्यास समर्थ आहे असे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी सोमवारी (९ ऑक्टोबर) सांगितले. तसेच  हल्ला झाल्यास शत्रूला "असह्य नुकसान" होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. ते देशाच्या वायव्य भागात रिजलपूरमधील असगर खान अकादमीतील पाकिस्तान वायुसेना कॅडेट्सच्या संबोधित करत होते. पाकिस्तान शांतताप्रिय देश आहे आणि शांततेला प्रोत्साहन देत असल्याचेही त्यांनी सांगितले.


बाजवा म्हणाले, आम्ही शांततेसाठी वचनबद्ध आहोत असून आम्हाला याविरोधी कार्यवाही करायची नाही. आमचे सैन्य कोणत्याही प्रकारचे अंतर्गत किंवा बाहेरच्या आक्रमणाचा सामना करण्यास सक्षम आहे. ते म्हणाले," जर एखाद्या शत्रूने हल्ला केला तर तो कितीही मोठ्या संख्येत असला तरीही त्याला खूप नुकसान सहन करावे लागेल. आतंकवादाशी लढताना पाकिस्तानने जेवढी कुर्बानी दिली आहे तेवढा अन्य कोणत्याही देशाने केला नसल्याचे ते म्हणाले. दहशतवादाविरोधातील पाकिस्तानच्या प्रयत्नांना व बलिदानाला आंतरराष्ट्रीय समुदाय समजू शकला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानला शांतता आणि स्थिरता आणण्यातील भारताने सहभाग वाढण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणि भारत व अफगाणिस्तान यांच्याबरोबर धोरणात्मक भागीदारी वाढविण्याचे आश्वासन दिले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खोकॉन अब्बासी यांनी सोमवारी (९ऑक्टोबर) अफगाणिस्तानतील भारताबाबतच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. भारताला युद्धप्रभावी देशात उतरविण्याची ट्रम्प यांची इच्छा घातक ठरेल असेही त्यांनी सांगितले. अरब न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, अब्बासींच्या मते ''पाकिस्तान-अमेरिका संबंधांमध्ये 
भारताला आणून काही साध्य होणार नाही.  विशेषत: अफगाणिस्तानमध्ये जेथे आम्ही भारताला कोणत्याही भूमिकेतून पाहत नाही."  सौदी अरब वृत्तपत्राच्या एका मुलाखतीत पाकिस्तानने म्हटले आहे की, अफगाणिस्तानच्या नेतृत्वात शांततेची गरज आहे.