नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. भारताच्या या निर्णयाचा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवरही विरोध करत आहे. पण त्यांना यात यश मिळत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे भारतीय सीमारेषेवर पाकिस्तानमार्फत कुरापत्या सुरुच आहेत. याचाच एक भाग म्हणून आज पाकिस्तानने पाकव्यात काश्मीरमध्ये तरुणांचा हत्यार म्हणून उपयोग करण्यास सुरुवात केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक लोकांची माथी भडकवून त्यांना सीमारेषेवर रॅली काढण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या कटाचा हा भाग असल्याने भारत ही पूर्णपणे तयार आहे. इस्लामाबादला आपली सीमारेषा सुरक्षित ठेवायला हवी म्हणून हे आंदोलन असल्याचे पाकिस्तान सैन्याचे समर्थन करणारे म्हणत आहेत. पाकिस्तानी सैन्य निशस्त्र लोकांना भडकवण्याचे प्रकार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.



हाय अलर्ट 


निवडणुकीनंतर दिवाळीचा सण आहे. त्यानंतर नाताळचा सण या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता असल्याने सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. तसे आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेषतः बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शहरातील अनेक भागांमध्ये छापे मारले. यावेळी दिल्ली पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी राजधानीमध्ये सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  सुरक्षा यंत्रणेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.