नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. मोदींच्या दिल्लीतल्या सभेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. दिल्लीत २२ डिसेंबरला मोदींची रामलीला मैदानावर सभा आहे. जैश-ए-मोहम्मदच्या टार्गेटवर मोदींची सभा असल्याची माहिती मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हीच सभा पाकिस्तानातली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या निशाण्यावर असल्याची माहिती गुप्तचर संस्थेनं दिलीय. त्यामुळे विशेष पोलीस पथक आणि दिल्ली पोलिसांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना गुप्तचर संस्थेनं दिल्या आहेत. सध्या देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात असंतोष आहे. त्यापार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. त्याचा गैरफायदा घेण्याचे मनसुबे दहशतवादी संघटना घेण्याची शक्यता नाकरता येत नाही. 


पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतात दंगल घडवण्याचा कट रचत असल्याचं समोर आले आहे. भारतातील संवेदनशील शहरात दगडफेक आणि दंगल घडवून आणण्यासाठी आयएसआय फंडिंग करत असल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या जामियातील हिसेंनतर देशभरातील संशयित दहशतवादी संघटनेचे फोन कॉल्सवर नजर ठेवली जात आहे.


सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेले निर्णय या सगळ्याला कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा, राम जन्मभूमी, अनुच्छेद 370, तीन तलाक यासारखे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. नागरिकत्व सुधारणा कायद्याला जगभरातून विरोध करण्यात आला आहे. या कायद्याविरोधात आंदोलन केली जात आहेत. दिल्लीसह मुंबई, लखनऊ, बंगलुरू यासारख्या आंदोलनांचे पडसाद उमटले. या आंदोलनात जामिया विद्यापीठासह अनेक शिक्षण संस्थांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसोबतच बॉलिवूड कलाकार देखील रस्त्यावर उतरताना दिसले. अजूनही या विरोधाचे लोण देशभरात पसरत आहेत.