इम्रान खान बावचळले, भारतासोबतचे व्यापारी संबध तोडले
जम्मू काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रासमोर नेला जाईल असे पाकिस्तानने म्हटले आहे.
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. हा निर्णय झाल्यापासून पाकिस्तानमधील चलबिचल कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. जम्मू काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रासमोर नेला जाईल असे पाकिस्तानने म्हटले आहे. तसेच पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापारी करार संपवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर १५ ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्रदिनी काळा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानने तिथल्या भारतीय राजदूतांना मायदेशी जाण्याचे आवाहनही केले आहे.