नवी दिल्ली : देशात दहशतवादी आणि देशद्रोही कृत्य करणाऱ्या, षडयंत्र रचणाऱ्या अनेक दहशतवाद्यांविरोधात सुरु असणाऱ्या खटल्यांसंदर्भात अत्यंत महत्त्वाचीबातमी समोर आली आहे. या खटल्यांवर पाकिस्तानची करडी नजर असल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार कारागृहात असणाऱ्या दहशतवाद्यांसंदर्भातील माहितीवर पाकिस्तान नजर ठेवून आहे. शिवा.य तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतींवरही लक्ष ठेवलं जात आहे. 


कायदेशीर त्रुटींवर लक्ष ठेवत भारत जिथं कमी पडेल तिथेच या संधीचा भायदा कला करता येईल याबाबत दहशतवाद्यांना सतर्क करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. 


चार्जशीटवर नजर 
सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानकडून तपास यंत्रणांच्या चार्जशीटवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ज्यामुळं सध्या अहवाल अपडेट करतेवेळी तपास यंत्रणांकडून कमालीची सतर्कता बाळगली जात आहे. 


आयएसआयची कपटी चाल
भारतामध्ये कारावासात असणाऱ्या आणि आयएसआयशी संबंध असणाऱ्या दहशतवादी आणि फुटीरतावादी यांच्याबाबतच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवलं जात असून, त्या मार्गानं आयएसआय पावलं उचलत आहे. 


तपास यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या कारवायांवर लक्ष ठेवत भारताकडून कशा प्रकारे निर्दोष पाकिस्तानी नागरिकांना वेठीस धरलं जात आहे हे दाखवत आपला डाव साधण्याचा कावेबाजपणा सध्या पाकिस्तान करत असल्याचं कळत आहे.