Pakistan Goats bought on installments: आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तान हे भारताला कमीपण दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून भारतीय सीमेत घुसखोरी करुन हल्ले केले जातात. असे असताना पाकिस्तानची अंतर्गत स्थिती काही ठिक चालल्याचे दिसत नाही. पाकिस्तानच्या डोक्यावर कधी न फेडता येईल इतके कर्ज आहे. त्यात पाकिस्तानमध्ये महागाईने उच्चांक गाठलाय. बकरी ईद काही दिवसांवर आलीय. अशा परिस्थिती नागरिकांना बकरा एकरक्कमी खरेदी करणे अवघड झाले आहे. पाकिस्तानात नक्की चाललंय काय?  पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी महागाई वाढवून जनतेला बळीचा बकरा कसं बनवलंय हेही जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी पाकिस्तानी नागरिक बकरे खरेदी करताना धडपडताना दिसत आहेत. यातून पाकिस्तानमध्ये महागाई किती वाढलीय याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. पाकिस्तानातील कराचीतील सर्वात मोठ्या गुरांच्या बाजारातही हा परिणाम दिसतोय. येथे लोक बळीची जनावरे खरेदी करण्यासाठी येत आहेत पण जनावरांच्या किंमती ऐकून ते परत जात आहेत. 


गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी पाकिस्तानात बकरी ईदला शेळ्या आणि इतर जनावरांचे भाव तिप्पट आहेत. महागाई इतकी वाढली आहे की बकरीदला बकरेही हप्त्यावर विकत घ्यावे लागत असल्याचे लोक सांगत आहेत. .


पाकिस्तानवर कर्जाचा बोजा


पाकिस्तानातील महागाईची स्थिती किती वाईट आहे याचा धडधडीत पुरावा समोर आलाय. शेजारी राष्ट्रातील नागरिकांना बकरी, शेळ्या एकरकमी घेणे परवडत नाही. यासाठी ते ईएमआयवर बकऱ्या घेत आहेत. पाकिस्तानी जनतेच्या त्रासाला अंत नाही असे दिसते. कारण आता शाहबाज सरकारने जनतेच्या डोक्यावर आणखी एक टॅक्स बॉम्ब फोडण्याचा निर्णय घेतला आहे.