पाकिस्तानचं भारताविरोधात कटकारस्थान, गुप्तचर विभागाचा खुलासा
पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच
नवी दिल्ली : पाकिस्तान भारताच्या विरोधात नवं कटकारस्थान रचत आहे. याचा खुलासा भारतीय गुप्तचर विभागाने केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान घुसखोरीसाठी नवी योजना आखत आहे. जम्मूमध्ये पाकिस्तान भारताला लागून असलेल्या सीमाभागात सामान्य लोकांचा आवर कमी करत आहे. पाकिस्तानने इन्फंट्री डिवीजनला बॉर्डरच्या जवळ तैनात केलं आहे. बीएसएफ विरुद्ध कटकारस्थान रचण्याचा पाकिस्तान प्रयत्न करतो आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्संना पाकिस्तानच्या पोस्टवर तैनात करण्यात आले आहे. बीएसएफच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानची ही योजना आहे. मंगळवारी बीएसएफ जवानच्या हत्येच्या आधीच पाकिस्तानने ही योजना बनवली होती.
आशिया कपमध्ये आज भारत-पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. पण त्याआधी पाकिस्तानच्या नापाक हरकती पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. बीएसएफच्या एका अधिकाऱ्यांच्यानुसार, हेड कांस्टेबल रँकच्या एका जवानाला सीमेच्या त्या बाजुने स्नाईपर शॉटने लक्ष्य केलं गेलं. आरएस पोरा क्षेत्रात बॉर्डर पोस्ट जवळ जेव्हा जवान उंच गवत कापत होते तेव्हा या जवानावर गोळी चालवली गेली.