नवी दिल्ली : Pakistan planning terrorist attack : पाकिस्तानच्या नापाक खुरापत्या पुन्हा सुरु झाल्या आहेत. प्रजासत्ताक दिनी घातपाताचा मोठा कट आणण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, तो भारतीय सुरक्षा यंत्रणेला याची माहिती मिळाली आहे. काश्मीरमध्ये मोठा हल्ला घडवण्याचा पाकिस्तानी कट आहे. त्यासाठी घुसखोरीचा दहशतवाद्यांचा (terrorist attack) मोठा प्रयत्न सुरु आहे. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसविण्याचा कट पाकिस्तानने आखला आहे. (Pakistan planning terrorist attack on Republic Day)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात मोठ्या घातपातात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. काश्मिरात दहशतवादी हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट असल्याची माहिती उघड झाली आहे. पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत, याची माहिती हाती लागली आहे.


धुक्याच्या आडून भारतात घुसण्याचा लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. या कटाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा दलं हाय अलर्टवर आहेत. जम्मूजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या हिरानगर, सांबा सेक्टरपासून एलओसीवरील सुंदर बनी, नौशेरा, बालाकोट, साब्जिया, केरनी, पूंछ भागातल्या पाकिस्तानी चौक्यांवर दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. 


दरम्यान, प्रत्येक पाकिस्तानी चौकीवर 4 ते 6 दहशतवाद्यांचा गट घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली आहे. या अलर्टनंतर सीमेवर लष्करी अधिकारी आणि सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. बीएसएफ आणि आर्मीचे जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत.