भारतात दहशतवादी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी पाकिस्तानविषयी माहिती दिली.
वॉशिंग्टन - भारतावर पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने पाकिस्तानकडून पसरवण्यात येणाऱ्या दहशतवादावर खळबळजनक खुलासा केला आला आहे. पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट भारतात सांप्रदायिक हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत असून भारत आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करत असल्याचेही अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.
गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी सांगितले की, पाकिस्तान काही गटांचा धोरणात्मक पद्धतीने वापर करत दहशतवादाविरोधात सहकार्य करत असल्याचे दर्शवित असून केवळ त्यांना धोका असलेल्याच दहशतवादी गटांना संपण्याचा प्रयत्न असेल. तसेच तालिबानीविरोधात दहशतवाद संपवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांनाही खाणून पाडण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट्स यांनी या मुद्द्यांवर संसदेतील निवड समितीच्या सदस्यांना माहिती दिली. पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट भारत, अफगाणिस्तान आणि अमेरिकेविरोधात हल्ला करण्याच्या तयारीत असून तशी योजना आखत आहेत. कोट्स आणि इतर अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांनी या देशव्यापी समस्येविषयी बोलताना हा अहवाल सादर केला.
भारतात सत्ताधारी भाजप निवडणुकांच्या आधी हिंदू राष्ट्रवादी विषयावर सतत जोर देत राहिले तर सांप्रदायिक हिंसेची मोठी शक्यता असल्याचे कोट्स यांनी सांगितले. भारत आणि चीनच्या चांगल्या संबंधांसाठी प्रयत्न सुरू असूनही भारत आणि चीन संबंध सुधारत नसल्याने यावर्षीही ते अधिक तणावपूर्ण राहण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.