नवी दिल्ली : देशातचं नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आता अनेक देशांमध्ये डेल्टा व्हेरिएन्टाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. आतापर्यंत डेल्टा व्हेरिएन्टने 104 देशांमध्ये एन्ट्री केली आहे. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे  प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसिस यांनी दिली. डेल्टा व्हेरिएन्टचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे रूग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ  होत असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय जगभरात या व्हेरिएन्टचे वाईट पडसाद उमटू  शकतात अशी शक्यता देखील त्यांनी यावेळी वर्तवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WHO प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, 'डेल्टा व्हेरिएन्ट जगात मोठ्या वेगात पसरत आहे. या व्हेरिएन्टमुळे रूग्णांची संख्येत तर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण या व्हेरिएन्टमुळे अनेकांचे प्राण देखील गेले आहेत. आतापर्यंत 104 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. येत्या काळात  हा  व्हेरिएन्ट संपूर्ण जगासाठी मोठं संकट ठरणार आहे.'


सांगायचं झालं तर डेल्टा व्हेरिएन्टचा पहिला रूग्ण भारतात आढळला होता. यावेळी WHOच्या  प्रमुखांनी जनतेला इशारा देखील दिला आहे. जे लोक कोरोना नियमांचं पालन करत नाहीत, त्यांना डेल्टा व्हेरिएन्टचा अधिक धोका आहे. ज्या देशांमध्ये लसीकरण अगदी धिम्या गतीने सुरू आहे, अशा देशांना कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएन्टचा अधिक धोका आहे. 


ज्यामुळे रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील वाढली आहे. WHO प्रमुख म्हणणाले, '5 क्षेत्रांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अफ्रिकेत  2 आठवड्यापूर्वी मृत्यूदर 30 टक्के होता पण आज तो 40 टक्क्यांवर येवून पोहोचला आहे.'  त्यांमुळे काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.


दरम्यान, हैदराबाद विद्यापीठाचे प्र-कुलगुरू असलेले ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ यांनी एक भीतीदायक दावा केला आहे की भारतात कोविड -19ची तिसरी लाट (3rd Wave of COVID-19) 4 जुलैपासून सुरू झाली आहे.