मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती सध्या खूप नाजूक आहे. दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना व्हेटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अटलजींना भेटायला नेतेमंडळी आणि सर्मथकांची झुंबड उडाली आहे. अटल बिहारी वाजयपेयींचे जीवन निर्विवाद होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा व्यक्तिगत आरोप लागला नाही. राजकारणाबरोबरच त्यांना साहित्य, कविता आणि सिनेमांचीही आवड होती. आता संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


१९९९ मध्ये सत्तेत आल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी दोन दिवसांच्या (१९-२० फेब्रुवारी) पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी दिल्ली-लाहोर बस सेवा सुरु करुन बसमधूनच लाहोरपर्यंतचा प्रवास केला होता.
बस सेवेचे उद्घाटन करुन वाजपेयी या सेवेचे पहिले प्रवासी बनले.



भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी वाजपेयींचे स्वागत केले होते. यावेळेस त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पीएम नवाज शरीफ यांची भेट घेऊन देशांच्या संबंधांची नव्याने सुरुवात केली.



यावेळेस दोन्ही देशांमध्ये लाहोर घोषणापत्र नावाचा द्विपक्षीय करार झाला. पण काही महिन्यांनंतर पाकिस्तानी घुसखोरीनंतर भारत-पाकिस्तानमध्ये कारगीर युद्ध झाले.



कारगीर युद्धकाळा दरम्यानही ही बससेवा सुरु होती. २००१ मध्ये पार्लामेंट अॅटॅकनंतर ही सेवा बंद करण्यात आली. १६ जुलै २००३ मध्ये द्विपक्षीय संबंध सुधाररण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात आले. यानंतर २००४ मध्ये (४-६ जानेवरी) अटलजी सार्क संमेलनात सहभागी होण्यासाठी इस्लामाबादला गेले होते.



पाकिस्तानचे माजी पंतप्रधान दिवंगत बेनजीर भुट्टोंची अटलजींनी भेट घेतली. १५-१६ जुलै २००१ मध्ये पाकचे राष्ट्रपती परवेज मुशर्रफ आणि तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आग्र्यात बैठक झाली. पण या बैठकीचा काही फारसा परिणाम झाला नाही. दोन्ही देशांमधील संबंध अधिकच बिघडले.