कराची : पाकिस्तानी रिपोर्टर चॉंद नवाबचा व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल झाला आणि त्याला जगभरात ओळख मिळाली. यातूनच प्रेरणा घेऊन 'बजरंगी भाईजान' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने चॉंद नवाबची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंतर तर चॉंद नवाब आणखी फॉर्मात आला. या सीनमध्ये तो रेल्वे स्टेशनच्या पायऱ्यांवर उभा राहून कॅमेरा समोर रिपोर्टींग करत असतो. मागच्या बाजुन धीम्या गतीने ट्रेन पुढे सरकतेय. कॅमेरा आणि चॉंद नवाबच्या मधून लोक चालू लागतात. त्यानंतर गोंधळलेला चॉंद नवाब लोकांना लाईव्ह कॅमेरा समोरून बाजुला हटण्यास सांगतो. त्या व्हिडीओनंतर आता आणखी एक रिपोर्टर व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळेस रिपोर्टच्या मध्ये माणसं येत नाहीएत तर चक्क कुत्रेच धावत येताना दिसत आहेत. याबद्द्ल सुरूवातील त्याला काही कळत नाही. पण जेव्हा कळत तेव्हा जे होत ते पाहण्यासारख आहे.


तो दचकलाच  



 पाकिस्तानी रिपोर्टर कुत्र्यांची रेसिंग कव्हर करतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. कुत्र्यांच्या रेसिंग बद्दल तो ऑन कॅमेरा माहिती देत होता.तेवढ्यात मागून वेगाने धावत येणारे कुत्रे दिसू लागतात. हे कुत्रे बरोबर त्याच्या बाजूने धावत पुढे सरकले.


सुरवातील तो या सर्वांपासून अनभिज्ञ होता पण त्याला जेव्हा मागे कुत्रे असल्याचा अंदाज आला तेव्हा तो दचकलाच. 


लोकांनी केलं कौतुक 


तो कॅमेराच्या फ्रेममधून बाहेर गेला. असं असलं तरी त्याने बातमी थांबवली नाही. तो सलग बोलत गेला. शेवटी त्याने कॅमरामनच नाव घेऊन नंतर साईन ऑफ केलं. हा व्हिडीओ पाकिस्तानच्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला. खूप लोकांनी त्याची खिल्ली उडवली तर काहींनी त्याच कौतुकही केल.