नवी दिल्ली : Pakistani terrorist arrested in Delhi : दिवाळीत मोठा घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला (Pakistani terrorist ) अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. या दहशतवाद्याला पूर्व दिल्लीच्या लक्ष्मी नगर भागातून अटक केली आहे. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळखपत्र मिळवले होते. (Pakistani terrorist arrested from Laxmi Nagar area; AK-47, hand grenade seized)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे एका पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्यात आले आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून एके -47 बंदूक आणि दारूगोळाही जप्त केला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने पूर्व दिल्लीच्या लक्ष्मी नगर भागातून पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडले आहे.


मोहम्मद अशरफ ऊर्फ ​​अली असे अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव आहे. दहशतवादी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी आहे. मोहम्मद अशरफ अली शास्त्री नगर, दिल्ली येथे अली अहमद नूरी या नावाने देशात लपला होता. पोलिसांनी दहशतवाद्याकडून एके -47 आणि ग्रेनेड जप्त केले आहेत. बनावट कागदपत्रांच्या मदतीने दहशतवाद्याने भारताचे ओळखपत्रही बनवले होते.



दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवादी मोहम्मद अशरफ ऊर्फ ​​अलीला यूए (पी) कायदा, स्फोटक कायदा आणि शस्त्र कायदा अंतर्गत अटक केली आहे. दिल्ली पोलिसांना अनेक दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की, पाकिस्तानी दहशतवादी राजधानीत लपले आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्याचा आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा दिल्ली पोलीस सातत्याने प्रयत्न करत होते. सध्या दहशतवादी मोहम्मद अशरफ यांची चौकशी केली जात आहे.


दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की आणखी किती लोक दहशतवादी मोहम्मद अशरफ सोबत आहेत? दहशतवादी मोहम्मद अशरफचे साथीदार इतर अनेक ठिकाणी लपले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. दिल्ली पोलीस इतरही अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी टार्गेट किलिंग करू शकतात. या व्यतिरिक्त, ते नवरा, दिवाळी सणांच्या दरम्यान लोकांना लक्ष्य करू शकतात. सध्या नवरात्री सुरू आहे. यामुळे मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी असते.