PAN-Aadhaar link check status: परमनंट अकाउंट नंबर कार्ड म्हणजेच पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) लिंक करण्याची शेवटची तारीख (Pan Aadhaar link last date) जवळ आली होती. 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, नागरिक जागृक नसल्याने, येत्या 30 जून 2023 पर्यंत अपडेट करण्यासाठी मुदत वाढवण्यात (Pan Aadhaar link New last date) आली होती. त्यामुळे आता जर तुम्ही आधार आणि पॅन लिंक केलं नाही तर तुम्हाचं पॅन कार्ड 1 जुलै 2023 पासून निष्क्रिय होईल. त्यामुळे लवकरात लवकर अपडेट करून घेणं गरजेचं आहे.  (PAN Aadhaar link last date has been extended to 30 June 2023 To give some more time to taxpayers latest marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थ मंत्रालयाने एका प्रकाशनात म्हटलं आहे की, करदात्यांना आणखी काही वेळ देण्यासाठी, पॅन आणि आधार लिंक (Pan link with aadhar) करण्याची तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्याद्वारे व्यक्ती परिणामांना सामोरं न जाता आधार-पॅन लिंकिंग करता येईल. करचोरीला आळा घालण्यासाठी पॅन-आधार लिंकिंग आवश्यक असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.


Aadhaar-PAN linking status कसं चेक करायचं?


इनकम टॅक्स विभागाने एसएमएसद्वारे स्टेटस चेक करण्याचा पर्याय दिलाय. करदात्यांना 567678 किंवा 56161 वर एक टेक्स्ट मॅसेज (SMS) पाठवावा लागेल. जर दोन्ही कार्ड लिंक असतील तर "Aadhaar is already associated with PAN in ITD Database," असा संदेश दिसेल. तर Income Tax e-filing portal ला भेट देऊन देखील स्टेटस चेक करता येईल.


तुम्हीही आधार पॅन लिंक केलंय का? प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 139AA नुसार आधार कार्ड असण्यास पात्र असलेल्या आणि पॅन कार्ड असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ही दोन्ही कार्ड 31 मार्चपर्यंत लिंक करणं आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही लिंकिंग झालं नसेल, तर हातातील काम सोडा आणि लिंक करून घ्या.


आणखी वाचा - Aadhaar Card Rules: आधार कार्डवर वारंवार नाही बदलता येत तुमचं नाव, काय आहे नियम? जाणून घ्या


आधार-पॅन लिंक कसं करायचं? (how to link pan card with aadhar)


आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड लिंक करता येईल. Link Your PAN with Aadhaar असा ऑप्शन दिल्यावर तुमचं प्रोफाईल सेटिंगमध्ये जा. तिथे जाऊन माहिती भरा आणि काही वेळातच तुमचं आधार पॅनकार्ड लिंक होईल.