मुंबई : सरकारने आता पॅन नंबरला आधार कार्डशी जोडण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 केली आहे. आपण अद्याप आपला पॅन नंबर आधार कार्डशी लिंक केलेला नसेल तर ही, आपली शेवटची संधी आहे. पॅन-आधार एकमोकांशी जोडणे बंधनकारक आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड इनवॅलिड (Invalid Pan Card)केले जाईल. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहार करताना समस्या येऊ शकतात, तसेच तुम्हाला 1हजार रुपयांपर्यंतचा दंडही भरावा लागू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेत सादर झालेल्या फायन्यान्स विधेयकानुसार, इनकम टॅक्स कायद्यामध्ये आता आणखी एक नवीन विभाग जोडण्यात आला आहे. हा पॅन-आधार लिंक संबंधीत विभाग आहे. आयकर कायदा 1961 मधील जोडल्या गेलेल्या कलम 237 H नुसार पॅन-आधार जोडलेला नसेल तर अशा लोकांना 1 हजार रुपये अतिरिक्त दंड भरावा लागेल. इनकम टॅक्स कायद्यामध्ये समाविष्ट केलेल्या नव्या तरतुदीनुसार सरकारने पॅन आणि आधार न जोडलेल्या लोकांच्या दंडाची रक्कम 1 हजार रुपये ठरवण्यात आली आहे.


पॅन-आधार कार्ड लिंकन केल्यामुळे पॅन कार्ड अवैध म्हणजेच इनवॅलीड घोषित केले जाईल. त्यामुळे जर कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही आर्थिक व्यवहारामध्ये इनवॅलीड पॅन कार्ड वापरल्यास त्याच्यावर 1हजार रुपये दंड आकारला जाईल. इतकेच नाही तर इनवॅलीड केलेले पॅनकार्ड दुसऱ्यांदा वापरल्यास दंडाची रक्कमही जास्त होईल. हा दंड निश्चित करण्याचा अधिकार आयकर अधिकाऱ्याला असेल.


पॅन-आधार लिंक करणे का आवश्यक आहे?


कलम 139AA अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आयकर विवरणपत्र आणि पॅन कार्ड बनविण्याच्या अर्जामध्ये आधार क्रमांक द्यावा लागेल. त्याचबरोबर, ज्यांना 1 जुलै 2017 पर्यंत पॅन वाटप करण्यात आले होते आणि जे आधार क्रमांक मिळवण्यासाठी पात्र आहेत त्यांना त्यांच्या पॅन कर्डशी आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे.


पॅन-आधार लिंक करण्यासाठी इनकम टॅक्स ई-फाइलिंग वेबसाइटला भेट द्या.


साइट पेजच्या डाव्या बाजूला तुम्हाला क्विक लिंक्सचा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला 'लिंक आधार' या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.


येथे तुम्हाला तुमचा पॅन, आधार क्रमांक आणि नाव टाकावे लागेल. ही माहिती दिल्यानंतर एक ओटीपी तुम्हाला पाठवला जाईल.


ओटीपी टाकल्यानंतर तुमचा आधार आणि पॅन जोडला जाईल.


हे लक्षात ठेवा की, इनकम टॅक्स विभाग तुमचा आधार आणि पॅन डीटेल्स क्रॉसचेक करत आहेत. त्यामुळे योग्यतीच माहिती भरा.


SMS द्वारे आपल्या पॅन कार्डला लिंक करु शकता


तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पॅन कार्डला आधार लिंक करू शकता. तुम्ही SMS द्वारे तुमच्या पॅनला आधार जोडू शकता. इनकम टॅक्स विभागाने सांगितले की, 567678  किंवा 56161 या नंबरवर SMSपाठवून पॅनशी आधार जोडू शकता.