PAN Card: पॅनकार्डधारकांना मोठा झटका, 31 मार्चपर्यंत पूर्ण करा हे काम, अन्यथा..
Pan Card Update News: तुम्हीही पॅनकार्ड वापरत असाल तर त्यासाठी आवश्यक अधिसूचना सरकारने जारी केली आहे. तुम्ही हे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण केलात नाहीतर तुम्हाला नुकसान सोसावे लागेल.
Pan Card Update News: इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने परमानंट अकाउंट नंबर होल्टर्सला आपल्या नंबरला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अखेरचा अलर्ट जारी केला आहे. दरम्यान पॅनकार्ड (pan card) वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, सरकार 13 कोटींहून अधिक लोकांचे पॅन कार्ड रद्द करू शकते. CBDT ने सांगितले आहे की, 61 कोटी पॅन कार्ड यूझर्सपैकी 48 कोटी लोकांनी ते त्यांच्या आधार कार्डशी लिंक केले आहे. त्याच वेळी, 13 कोटी लोकांनी अद्याप त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही.
सरकारच्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. यासाठी 31 मार्च 2023 ची अंतिम मुदत ठरवली आहे. आधारशी लिंक नसलेले वैयक्तिक पॅन या तारखेनंतर निष्क्रिय घोषित केले जातील असे सांगण्यात आलेय. यासोबतच सरकारने म्हटले आहे की, सध्यापासून 31 मार्चपर्यंत पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.
पॅन-आधार लिंकिंग आवश्यक आहे.
वाचा: 'दृश्यम 2' चा दिग्दर्शक अडकला लग्नबंधनात, गोव्यात पार पडला शाही विवाहसोहळा
पॅन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक करावे?
तुमचा पॅन आणि आधार लिंक नसल्यास, तुम्ही ते एसएमएस किंवा ऑनलाइनद्वारे लिंक करू शकता. SMS द्वारे आधारशी पॅन लिंक करण्यासाठी, तुमचा नोंदणीकृत फोन नंबर वापरून 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवा.
पॅन कार्ड आधारशी कसे लिंक करावं
-यासाठी सर्वप्रथम इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
-यानंतर, तुम्हाला डाव्या बाजूला Quick सेक्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
-नवीन विंडोवर तुमचा आधार डिटेल्स, पॅन आणि मोबाइल नंबर टाका.
-'I validate my Aadhar details' या पर्यायावर क्लिक करा.
-तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर OTP पाठवला जाईल, तो यामध्ये करा आणि सबमिट करा.
-दंड भरल्यानंतर तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.