Abhishek- Shivaleeka Oberoi Wedding : 'दृश्यम 2' चा दिग्दर्शक अडकला लग्नबंधनात, गोव्यात पार पडला शाही विवाहसोहळा

Abhishek Pathak-Shivaleeka Oberoi Wedding : मनोरंजन विश्वातील कियारा आडवानी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Kiara Advani, Sidharth Malhotra) या बॉलिवूड कपल नुकतेच लग्नबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाची चर्चा असताना आणखी एक कपल लग्नबंधनात अडकले आहे. अजय देवगणच्या 'दृश्यम २' (drishyam 2) चे दिग्दर्शक अभिषेक पाठक आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली असून अभिषेक अभिनेत्री शिवालिका ओबेरॉयसोबत लग्नगाठ बांधली आहे. 

Feb 10, 2023, 13:20 PM IST
1/5

'ते ये साली आशिकी' व 'खुदा हाफिज' यासारख्या चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय व 'दृश्यम 2'चा दिग्दर्शक अभिषेक पाठक (Abhishek Pathak)या दोघांबद्दल. शिवालिका व अभिषेक दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. काल (9 फेब्रुवारी) दोघांनीही गोव्यात लग्नगाठ बांधली.   

2/5

24 जुलैला शिवालिकाच्या वाढदिवशी या कपलने साखरपुडा केला होता. काल 9 फेब्रुवारीला दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे काही फोटो अभिषेक व शिवालिकाने शेअर केले आहेत. 

3/5

या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अजय देवगण, कार्तिक आर्यन, नुसरत भरूचा, विद्युत जामवल, सनी सिंह, भूषण कुमार असे सगळे बॉलिवूडचे दिग्गज या लग्नात सहभागी झाले होते.

4/5

शिवालिकाने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर 2014 साली आपलं फिल्मी करिअर सुरू केलं. किक या चित्रपटासाठी तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. तर अभिषक पाठक याने 'दृश्यम 2' दिग्दर्शित केला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.

5/5

शिवालिकाने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर 2014 साली आपलं फिल्मी करिअर सुरू केलं. किक या चित्रपटासाठी तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. तर अभिषक पाठक याने 'दृश्यम 2' दिग्दर्शित केला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.