नव्या वर्षात या १० कामांसाठी पॅन नंबर आहे गरजेचा
नव्या वर्षात नव्या कामांसाठी पॅन नंबर गरजेचा झाला आहे. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच टॅक्स चोरी रोखण्यासाठी सरकारने पॅनकार्डचा वापर अनिवार्य केलाय.
नवी दिल्ली : नव्या वर्षात नव्या कामांसाठी पॅन नंबर गरजेचा झाला आहे. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच टॅक्स चोरी रोखण्यासाठी सरकारने पॅनकार्डचा वापर अनिवार्य केलाय.
याआधीही काही ठिकाणी पॅनकार्ड आवश्यक होते मात्र याचा वापर आता अधिक वाढलाय. त्यामुळे नव्या वर्षात १० कामांसाठी तुम्हाला पॅन नंबर आवश्यक आहे.
या १० कामांसाठी पॅन नंबर आहे आवश्यक
बँक अकाऊंट सुरु करणे वा FDसाठी गरजेचा
दिवसाला ५० हजार वा त्याहून अधिक रक्कम काढण्यासाठी
प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी
गाडी खरेदी करण्यासाठी
परदेशात प्रवासासाठी फ्लाईटचे तिकीट बुक करण्यासाठी
हॉटेल बिल पेमेंटसाठी गरजेचे
शेअर, बॉन्ड, म्युच्युअल फंड अथवा डिबेंचर खरेदीसाठी
क्रेडिट, डेबिट कार्ड अथवा डीमॅट अकाऊंटसाठी अप्लाय करण्यासाठी
कोणत्या प्रकारच्या कमाईसाठी, नाहीतर २० टक्के टीडीएस कापला जाईल
प्रीपेड मनी वॉलेट अथवा गिफ्ट कार्डवरुन ५० हजार वा त्याहून अधिकच्या खरेदीसाठी
असे बनवा ऑनलाईन पॅनकार्ड
ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला NSDL पोर्टल www.tin-nsdl.com वर जाऊन सर्व्हिसेसवर जा. त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमची बेसिक माहिती, मोबाईल, ईमेल आयडी द्यावा लागेल. आपले डॉक्युमेंट स्कॅन करुन अपलोड करा. तसेच फी ऑनलाईन जमा करावी लागेल. तुमचे पॅनकार्ड तयार होईल.