Pradeep Mishra : भर कार्यक्रमात पंडित प्रदीप शर्मा जखमी, नेमकं काय झालं? डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
Pradeep Mishra Health Update : भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या एका कार्यक्रमात डोक्यात नारळ लागल्याने मेंदूला सुज आली आहे. त्यावर डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली.
Pandit Pradeep Mishra : शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा (Pradeep Mishra) यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रदीप मिश्रा यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने मेंदूला सूज (Swelling In Brain) आली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. आष्टा येथे महादेव होळीच्या कार्यक्रमात त्यांच्या डोक्याला नारळ लागल्याने मेंदूला सूज आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात (Pradeep Mishra Health Update) आलं. उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता त्यांची कथा काही दिवस होणार नाही.
नेमकं काय झालं?
पंडित प्रदीप मिश्रा सोमवारी मनसा येथे शिवमहापुराण कथन करण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी माहिती दिली. 29 मार्च रोजी आष्टा येथे महादेव होळी खेळली होती. यादरम्यान कोणीतरी गुलालाऐवजी नारळ टाकला, त्यामुळे मेंदूमध्ये मार लागला. अंतर्गत दुखापतीमुळे मेंदूला सूज आल्याचं त्यांनी सांगितलं. मनावर जास्त जोर देऊ नका असे डॉक्टरांनी सांगितले आहे. जोपर्यंत डॉक्टर परवानगी देतनाहीत तोपर्यंत आम्ही कथा सांगू शकत नाही, असं पंडित प्रदीप मिश्रा यांनी म्हटलं आहे.
पुढील वर्षी विठ्ठलेश सेवा समिती मनसा येथे कथा करण्यासाठी येणार असल्याचं देखील प्रदीप मिश्रा यांनी स्पष्ट केलं. प्रकृतीत सुधारणा होताच पुढील कथा करू, असं म्हणतात भाविकांनी एकच जल्लोष केला. प्रदीप मिश्रा यांनी रविवारी 31 मार्च रोजीही शहरात कलश यात्रा काढण्यात आली. पहिल्याच दिवशी कथा ऐकण्यासाठी सुमारे 50 हजार लोक कथा मंडपात पोहोचले होते. पण पंडित प्रदीप मिश्रा यांनी कथा रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर ते निराश होऊन परतले.
प्रदीप मिश्रा यांची प्रकृती ढासळल्याने काही महिलांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या रडू लागल्या. कथा ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरताना दिसत होते. प्रदीप मिश्रा यांच्या उत्तम आरोग्यासाठी सिहोर जिल्हा संस्कार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील सायकाखेडी येथील वृद्धाश्रम व मरीह माता मंदिरात पोहोचून त्यांना लवकर बरे व्हावे यासाठी हवन यज्ञाचं आयोजन केलं आहे.