Panipuri wala gets GST Notice : पाणीपुरी म्हणजे सर्वांचाच आवडता विषय. पाणीपुरीचा स्टॉल दिसला की अनेकांची पावले थांबतात. पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय दिसालया छोटासा असला तरी यातून लाखो रुपयांचा कमाई होते. एका पाणीपुरी विक्रेत्याने वर्षभरात 40,11,019 लाख रुपये कमावले आहेत. त्याचे  PHONEPE आणि RAZORPA चे पेमेंट रॉकर्ड पाहून आयकर अधिकारी चक्रावले आहेत. या पाणीपुरी विक्रेत्याला GST नोटीस पाठवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च पदावर नोकरी करणाऱ्यांनाही 40 लाखाचे पॅकेज नसते.  मात्र,  तामिळनाडूतील  पाणीपुरी विक्रेत्याने वर्षभरात  40 लाखांची कमाई केली आहे. PHONEPE आणि RAZORPA चे पेमेंट रॉकर्ड मुळे या पाणीपुरी विक्रेत्याच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. ऑनलाईन 40 तर कॅशमध्ये या पाणीपुरी विक्रेत्याने किती कमावले असतील असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. या पुणीपुरी विक्रेत्याने वर्षभरात 70 ते 80 लाख रुपये कमावले असतील असा अंदाज लावला जात आहे. 


सध्या सर्वत्र ग्राहक UPI द्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे का अशी विचारणा करतात. यामुळे तामिळनाडूतील या पाणीपुरी विक्रेत्याने देखील आपल्या पाणीस्टॉलवर UPI स्कॅनर लावले. ग्राहक पाणीपुरी खात होते आणि ऑनलाईन पेमेंट करत होते. या पाणीपुरी विक्रेत्याच्या PHONEPE आणि RAZORPA वर 40,11,019 लाखांचे पेमेंट आले. 


या पाणीपुरी विक्रेत्याच्या 2023-2024 चा रेकॉर्डनुसार त्याच्या PHONEPE आणि RAZORPA या ऑनलाईन अकाऊंटवर 40,11,019 लाखांचे पेमेंट आले. तामिळनाडू आयकर विभागाने या रेकॉर्डच्या मदतीने पाणीपुरी विक्रेत्याला GST कायद्याअंतर्गत नोटीस बजावली आहे.   TNGST/CGST कायदा, 2017 च्या कलम 23 च्या उप-कलम (2) नुसार, सरकारी, अधिसूचनेद्वारे या पाणीपुरी विक्रेत्याला GST नोंदणी करण्याची सूचना केली आहे.