अहमदाबाद : पॅरासिलिंग करताना मोठी दुर्घटना घडली आहे. ही पहिली वेळ नाही तर अहमदाबादमध्ये दुसरी घटना आहे. याआधीही अशाप्रकारची घटना समोर आली होती. पुन्हा एकदा पॅरासिलिंग करताना 3 जण 100 फुटावरून खाली कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता पॅराशूटमधून तीन जण टेक ऑफ करतात तोपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू असतं. मात्र 100 फुटावर गेल्यावर मात्र दुर्घटना घडते. 3 जण खाली कोसळतात. 



दोरीच्या एका बाजूला जास्त जोर पडला आणि बॅलन्स बिघडल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. पॅराशूट हवेच्या दबावामुळे टर्न घेतो. मात्र त्याने टर्न घेण्याऐवजी काहीतरी वेगळंच घडलं. तिघंही खाली कोसळले. 


तीन जणांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिघांनाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. याआधी नोव्हेंबर 2021 मध्ये अशाच प्रकारची घटना समोर आली होती. नगवा बीचवरचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर ही दुसरी घटना आहे.