निर्दयी आई-वडील; फक्त या कारणामुळे चिमुकलीला रूग्णालयात सोडलं आणि...
का केलं चिमुकलीच्या आई-वडिलांनी असं?
नवी दिल्ली : फक्त आई-वडील कोणतचं स्वार्थ न बाळगता आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. पण मध्य प्रदेशातील हरदा गावात आई-वडिलांनी फक्त एका कारणासाठी नुकताचं जन्म घेतलेल्या मुलीला रूग्णालायातचं सोडून पळ काढला. चिमुकलीला रूग्णालयात सोडण्याचं कारण म्हणजे तिने उल्ट्या पायाने जन्म घेतला. या चिमुकलीचे पाय गुडघ्यांपासून उलटे आहेत. डॉक्टरांनी या मुलीला दुर्मिळ म्हटलं आहे.
दैनिक भास्करने दिलेल्या रिपोर्टनुसार हरदा येथील खिरकिया ब्लॉकच्या झांझरीमध्ये राहणाऱ्या विक्रम आणि त्यांची पत्नी पप्पीने सोमवारी दुपारी 12 वाजता एका गोंडस मुलीला जन्म दिला. नॉर्मल डिलीव्हरी झाल्यानंतर त्यांना कळालं की मुलीचे दोन्ही पाय उल्टे आहेत.
असामान्य मुलीला जन्म दिल्यामुळे आई आणि वडिलांनी मुलीला रूग्णालयातचं सोडून फरार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. मुलीला पाहिल्यानंतर नर्स आणि डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसला. एवढंच नाही तर मुलीचं वजन देखील फार कमी आहे. सामान्यतः नवजात बालकांचं वजन 2.7 किलो ते 3.2 किलो एवढं असतं.
पण ही चिमुकली फक्त 1.6 किलोची आहे. सध्या चिमुकली डॉक्टरांच्या देखरेखी खाली आहे. यावर बालरोग तज्ञ डॉक्टर सनी जुनेजा म्हणाल्या, 'माझ्या 5 वर्षांच्या करियरमध्ये मी पहिल्यांदा अशी केस पाहिली पाहिली आहे. मी यासंदर्भात बालरोग आणि आर्थोपेडिक तज्ज्ञांसोबत देखील याबद्दल चर्चा केली आहे. त्यांनी देखील ही दुर्मिळ केस असल्याचं सांगितलं आहे.'