Trending News In Marathi: मुलगी झाली आणि आई वडिलांचा चेहराच उतरला. नकोशा असलेल्या मुलीला ती चार वर्षांची असतानाच जंगलात सोडले. मुलगी मरणाच्या दारात असतानाच तिचे नशीब चमकले. जंगलाजवळून जाणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या कानावर मुलीच्या रडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने जाताच तहान-भुकेने व्याकुळ झालेली चिमुकली दिसली. भयाण जंगलात रडणाऱ्या मुलीला पाहून तो भावूक झाला आणि कोणताही विचार न करता तिला घरी घेऊन आला. आज त्या मुलीला तिच्या हक्काचा जोडीदार मिळाला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळं जीव वाचलेल्या मुलीचे आज धुमधडाक्यात लग्न होणार आहे. राजस्थानात ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिस अधिकारी गस्तीवर असताना त्यांना जंगलात एक मुलगी सापडली. ते तिला घेऊन घरी आले. एक आठवडा त्यांनी तिचा सांभाळ केला त्यानंतर एका कुटुंबाकडे मुलीची जबाबदारी सोपवली. पण प्रत्येक महिन्याला ते मुलीची खबरबात ठेवत होते. आज या मुलीचे लग्न जमले आहे. तिच्या लग्नासाठी समस्त पोलिस दल जमले होते.  


राजस्थानात मायरा भरणे ही एक प्रथा असते. यावेळी मुलीच्या माहेरकडून लेकीला काही भेटवस्तू दिल्या जातात. या मुलीची मायरा भरण्याची प्रथा सुरु असतानाच सर्वच्या सर्व पोलिस दल तिथे उपस्थित होते. इतक्या मोठ्या संख्येने पोलिस आल्याने काही क्षण तिथ शांतता पसरली होती. मात्र जस त्यांनी पोलिसांनी मायरा भरण्याची सुरुवात केली तेव्हा उपस्थित लोकही आश्चर्यचकित झाले. 


17 वर्षांपूर्वी सांभर ठाण्याचे तत्कालीन पोलिस अधिकारी रामफूल सिंह गस्तीवर होते. तेव्हा रात्रीच्या वेळी एक चार वर्षांची मुलगी जंगलात रडताना दिसली. त्यांनी आई-वडिलांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यांची काहीच खबर लागली नाही. अखेर ते तिला घरी घेऊन आले. मुलीला घरी घेऊन आल्यानंतरही त्यांनी काही दिवस तिच्या आई-वडिलांचा शोध सुरु ठेवला. काही दिवसांनी त्यांनी मुलीचा सांभाळण्याची जबाबदारी एका कुटुंबाकडे सोपवली. मात्र तरीही ते तिच्याकडे लक्ष ठेवून होते. प्रत्येक आठवड्याला तिची विचारपूस करायला जात. तसंच, फोनवरही तिची चौकशी करत. त्यांनी मुलीचं नाव देगी असं ठेवलं होतं. 


 आता देगीचे लग्न ठरले आहे. ही बाब पोलिस ठाण्यात कळताच ते तिचा मायरा भरण्यासाठी पोहोचले. पोलिसांनी 51 हजाराची रोख रक्कम आणि सोने चांदीचे दागिने मुलीला देऊ केले आहेत. डीएसपी लक्ष्मी सुथार यांनी सगळ्यातपहिले देगीच्या डोक्यावर ओढणी दिली त्यानंतर टिळा लावून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी उपस्थित होते.