नई दिल्ली : नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या सरचिटणीसांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षित कामासाठी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले होते.


1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच १ फेब्रुवारीला संसदेत आपला चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर अधिवेशनाचा दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होईल आणि 8 एप्रिल रोजी संपेल. देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. गेल्या काही दिवसांत लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांच्या विविध सेवांशी संबंधित सुमारे 400 कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत.


राज्यसभा सचिवालयातील 65 कर्मचारी, लोकसभा सचिवालयातील 200 कर्मचारी आणि संबंधित सेवांचे 133 कर्मचारी 4 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान कोविड तपासणी दरम्यान संक्रमित आढळले आहेत.