लोकसभेत `या` विधेयकाला मंजुरी; `एनआयए`ला परदेशात भारतीयांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या तपासाचे अधिकार
`एनआयए`च्या तपासाच्या कक्षा विस्तारणार
नवी दिल्ली: लोकसभेत राष्ट्रीय तपास यंत्रणा (सुधारणा) विधेयक, २०१९ सोमवारी मंजूर करण्यात आले. या विधेयकाला मंजुरी मिळाल्याने 'एनआयए'ला आता परदेशातही दहशतवादी हल्ल्यांसदर्भातील तपास करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
यासंदर्भात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले की, मोदी सरकार कधीही या कायद्याचा गैरवापर करणार नाही. देशातून दहशतवाद संपवण्यासाठी हा कायदा गरजेचा असल्याचे शहा यांनी म्हटले.
तर राज्यसभेत या मुद्द्यावरून अमित शहा आणि एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी भाजपचे खासदार सत्यपाल सिंह बोलत असताना विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. हैदराबादमध्ये एका प्रकरणात पोलीस आयुक्तांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप सत्यपाल सिंह यांनी केला. त्यावेळी ओवैसी यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना प्रत्युत्तर दिले.
सत्यपाल सिंह यांनी यासंदर्भात सर्व पुरावे सभागृहासमोर ठेवावेत, अशी मागणी ओवैसी यांनी केली. तेव्हा अमित शहा यांनी हस्तक्षेप करत ओवैसी यांनी थांबवले. विरोधकांच्या भाषणावेळी सत्ताधारी गोंधळ घालत नाही. त्यामुळे आता विरोधकांनी तसेच वागावे, असे अमित शहा यांनी म्हटले.
'मला भीती वाटतेय' ओवेसींच्या या वक्तव्यावर अमित शहांचे उत्तर
तुम्हाला ऐकून घ्यायची सवय लावावी लागेल. जेव्हा दुसरं कोणी बोलत तेव्हा तुम्ही ऐकून घेता, पण सत्यपालजी बोलतात तेव्हा तुम्ही मध्येच बोलत राहता. तुम्हाला ऐकायची सवय लावाली लागेल, असे अमित शहा यांनी म्हटले.