तिहेरी तलाक विधेयकाला राज्यसभेत मिळणार मंजुरी?
तिहेरी तलाक विधेयकाचा मार्ग यावेळी प्रशस्त होण्याची चिन्हे आहेत.
नवी दिल्ली : तिहेरी तलाक विधेयकाचा मार्ग यावेळी प्रशस्त होण्याची चिन्हे आहेत. कारण काही विरोधकांनी या विधेयकाला विरोध करत सभात्याग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यसभेत १०१ विरुध ९१ मतांनी तिहेरी विधेयक मंजूर होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेतील मतदानाच्या वेळी या विधेयकातील वादग्रस्त तरतुदीचा निषेध करीत विरोधकांपैकी काही पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग करायचा आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा मोदी सरकारला मिळवून द्यायचा, अशी रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. यात मोदी सरकार यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे तिहेरी तलाकला तलाक मिळण्याची शक्यता आहे.