नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होते आहे. येत्या १८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सरकार १६ नवी विधेयकं मांडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळी अधिवेशन पाण्यात गेल्यावर फेब्रुवारी ते मे दरम्यान दोन टप्प्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेकॉर्ड कामकाज झालं. त्यात जीएसटी लागू करण्यासाठी मिळालेल्या विरोधकांच्या सहकार्याचा हवाला देऊन यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा अधिवेशनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.