मुंबई : सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ. या व्यासपीठावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. त्यात प्राणी-पक्ष्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा एका पोपटाचा व्हिडीओ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक कुटुंबियांच्या घरी पोपट पाळला जातो आणि त्याचा आवाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. पण व्हायरल व्हिडीओतील पोपट घरात सहजपणे वावरत संवाद साधत असल्याचं पाहून नेटकरी आवाक झाले आहेत. 


शक्यतो पोपट माणसं बोलतात त्याचा पुनरुच्चार करतात. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पोपट माणसांशी संवाद साधताना दिसत आहे. आयपीएस अधिकारी दिपांशु काब्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.


व्हायरल व्हिडीओत पोपट एका टेबलावर बसलेला दिसत आहे. लहान मुलासारखा घरातील स्त्रीला हाक मारताना दिसत आहे. पोपट 'मम्मी...' अशी जोरदार हाक देतो. तर घरातील स्त्रीही त्याला प्रत्युत्तर देते. 


हा व्हिडीओ शेअर करताना दिपांशु काब्रा यांनी लिहिलं आहे की, "संवाद साधण्याची एक वेगळीच मज्जा असते. जेव्ही कोणी इतक्या आत्मीयतने संवाद साधतं. हा संवाद ऐकून असं वाटतं की खरंच आपल्याला प्रत्येक प्राणीमात्रांशी बोलता आलं असतं तर.."



पोपटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओखाली कमेंट्सचा वर्षाव सुरु वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.