नवी दिल्ली : ७ ऑगस्टला चंद्रग्रहण होणार आहे जो संपूर्ण भारतात दिसणार आहे. एमपी बिर्ला तारांगणाचे संचालक देवीप्रसाद द्वारी यांनी सांगतलं की, 'रात्री १०:५२ पासून सुरु होणाऱ्या चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या सावलीमध्ये प्रवेश करेल. ही एक सुंदर आकाशीय घटना असणार आहे. हे या वर्षातील पहिलं खंडग्रास चंद्रग्रहण आहे.


ग्रहणाच्या सर्वोच्च बिंदूला चंद्रबिंबाचा २४.६ टक्के भाग पृथ्वीच्या छायेमुळे झाकोळला जाईल. तर रात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी हे ग्रहण सुटणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण आशिया खंडात आणि ऑस्ट्रेलियामध्ये दिसणार आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत हे पाहता नाही येणार कारण तेथे दिवस असणार आहे.