नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि कोरोना चाचणीलाही वेग आला आहे. अशा परिस्थितीत १५ ऑगस्टची तयारीही सुरू झाली आहे. स्वातंत्र्य दिनासाठी अनेक मोठे निर्णय आणि खबरदारी घेण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमात भाग घेणारे भारतीय लष्कर, इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही आणि दिल्ली पोलिसांचे सर्व अधिकारी १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन असणार आहेत. यामध्ये अधिकारी, ऑपरेटर, कुक, बस चालक, ट्रेनर आणि त्यांच्याशी संबंधित सर्व कर्मचार्‍यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन ठेवण्यात आले आहेत.


क्वारंटाईन कालावधीत, सर्व अधिकारी आणि त्यांचे सर्व कर्मचारी, कार्यक्रमात सामील असलेले सर्व कर्मचारी १५ ऑगस्ट संबंधित तालीम आणि तयारीसाठीच फक्त जावू शकतात. या कामानंतर ते थेट थेट घरी जातील. दिल्ली पोलिसांचे जे कर्मचारी या कार्यक्रमाचा भाग असतील किंवा सुरक्षिततेत सामील असतील त्यांनाही हा आदेश तोंडी देण्यात आला आहे.


रेड कार्पेटवर गार्ड ऑफ ऑनर दरम्यान, पंतप्रधान स्वत: सेनापती आणि सैनिक यांच्या जवळून जातात. हे लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन देशाच्या पंतप्रधानांसह व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी अधिकाऱ्यांसह जवान हे देखील कोरोनापासून लांब राहू शकतील.


१५ ऑगस्टपर्यंत सर्व सरकारी वाहनांना स्वच्छ ठेवण्याचे आणि सॅनिटाईज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय सैन्याच्या पुढाकाराने व योजनेनंतर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही रूपरेषा तयार करण्यात आली आहे.