मुंबई : बाबा रामदेव यांचे सहकारी आणि पतंजलिचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि डीमार्टचे राधाकिशन दमनी यांचे नाव भारतातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालकृष्ण यांच्या संपत्तीमध्ये १७३% वाढ होऊन ७० हजार करोड झाली आहे. तर रिटेल सेक्टरमधील अग्रगण्य नाव आणि कंपनीचे सर्वेसर्वा राधाकिशन दमनी यांच्या संपत्तीमध्ये ३२०% वाढ झाली आहे.  
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी श्रीमंतांच्या यादीतील आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. 


 शेअर बाजारातील उसळीमुळे रिलायन्सचे शेअर्स वाढले आहेत. परिणामी मुकेश अंबानी यांची संपत्ती ५८ टक्क्यांनी वाढून २५७० अब्जांवर गेली आहे. अंबांनींची संपत्ती येमेन  देशाच्या  जीडीपीपेक्षा ५० टक्के अधिक आहे.