नवी दिल्ली : घरातील कचरा साफ करण्यासाठीही दरमहा पैसे मोजावे लागले तर ? दिल्लीतील महापालिकांमध्ये असा निर्णय येत्या काळात होण्याची शक्यता आहे. 


निर्णय घेणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील तीन महानगरपालिका आणि दिल्ली केैंट बोर्डाने दिल्ली सरकारच्या शहरी विकास मंत्रालय हा निर्णय घेणार आहे. यामध्ये कचऱ्यासाठी नागरिकांकडून अनिवार्य फी भरण्याची मागणी केली आहे. 
'नवभारत टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेणी आणि स्थानानुसार प्रत्येक महिन्याला कचरा बाहेर काढण्यासाठी ५० ते २०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव असल्याचे दिल्ली सरकारच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.


घेणार २ हजार रुपये


रेस्टॉरंट्स आणि धार्मिक संस्था अशा कमर्शिअल ठिकाणांहून कचरा संकलनासाठी प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये घेण्याचा प्रस्ताव आहे. 


सत्येंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखालील नागरी विकास मंत्रालयाकडून या प्रस्तावास मान्यता मिळण्याची प्रतिक्षा आहे.


दिल्लीतील घरांतून कचरा गोळा करण्याची व्यवस्था एनडीएमसीच्या दोन झोनमध्ये सुरू झाली आहे. ही सुविधा रोहिणी आणि सिव्हिल लाईन्समध्ये सुरु झाली आहे आणि एनडीएमसीच्या सर्व ६ क्षेत्रांमध्ये ती लागू होणार आहे.