Property News Today: घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण घर घेणं खाऊची गोष्ट नाही. तुम्ही घर खरेदी करणार असाल तर अनेक गोष्टी लक्षपूर्वक कराव्या लागतात. घर खरेदी करताना एखादी चूक तुम्हाला संकटात टाकू शकते. त्यामुळे घर खरेदी करताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होम लोनशिवाय अनेक गोष्टी या घर खरेदी करताना कराव्या लागतात. तुमच्या घराचं लोकेशन, फ्लॅटचा ताबा, कार्पेट आणि कवर्ड एरिया अशा अनेक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. (pay attention to these things while buying a new house and no big loss trending news)


'या' गोष्टी लक्षात ठेवा!


मालमत्तेची किंमत


घर खरेदीसाठी सर्वप्रथम तुम्हाला बजेट बनवावे लागेल. तुम्ही किती पैसे खर्च करू शकता याचा पहिले अंदाज काढा. जर तुमचे बजेट निश्चित असेल तर त्यानंतर तुम्हाला घर निवडणे खूप सोपे जातं. याशिवाय, तुम्ही जवळच्या बिल्डरकडून घराचे दर देखील जाणून घ्या.


घराचे लोकेशन


यानंतर तुम्हाला घर कोणत्या ठिकाणी घ्यायचे आहे किंवा तुमच्या घराभोवती कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत. तुमच्या दैनंदिन गरजा आणि कनेक्टिव्हिटी सुविधा कशा आहेत? याचीही विशेष काळजी घ्यावी.


मालमत्ताची कायदेशीर माहिती


तुमचे घर कोणत्या जमिनीवर बांधले आहे, अर्थात तुमची जमीन कायदेशीर अडथळ्यांपासून पूर्णपणे मुक्त असावी, याचीही तुम्हाला माहिती असली पाहिजे. याशिवाय यावर सर्व प्रकारची मान्यताही असावी.


कारपेट एरिया


तुम्ही तुमच्या घराचे चटई क्षेत्र देखील तपासले पाहिजे. कारण बहुतेक मालमत्ता जाहिराती बिल्ट अप एरियाबद्दल माहिती देतात. बिल्ट अप एरियाच्या तुलनेत कार्पेट एरिया 30 टक्क्यांनी कमी झाला आहे. बिल्ट अप एरियामध्ये शाफ्ट, लिफ्टची जागा, जिने, भिंतीची जाडी यांसारख्या गोष्टींचाही समावेश होतो.


पजेशनची तारीख लक्षात ठेवा


तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराचा ताबा घेणार असणार त्या दिवसाची तारीख माहिती करु घ्या. काही वेळा बांधकाम व्यावसायिक ताबा देण्यात बराच वेळ घालवतात. साधारणपणे बिल्डर तुम्हाला सहा महिन्यांचा वाढीव कालावधी मागू शकतो, पण त्यासाठी वैध कारणही असायला हवे.


बँकेतून गृहकर्ज घेताना राहा सावधान


याशिवाय तुम्ही कोणत्या बँकेकडून गृहकर्ज घेत आहात याचीही माहिती असायला हवी. तसंच बिल्डरच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कोणती बँक कर्जाची सुविधा देत आहे, यासंदर्भात माहिती असायला हवी.