DLC News : तुम्ही पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पेन्शनधारकांसाठी (Pension) नोव्हेंबर (November) महिना खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला या महिन्यात जीवन प्रमाणपत्र जमा (Jeevan Pramaan Patra) करायचं आहे. त्यामुळे तुमचं हे प्रमाणपत्र दोन कारणाने रद्द होऊ शकतं. त्यामुळे पेन्शनधारकांना फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणून यात कुठलीही चूक होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन प्रक्रियाबद्दल (Online process) सांगणार आहोत. (Pensioners Alert Digital Life Certificate  digital life certificate big news nmp)



ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची प्रक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तुम्ही  https://jeevanpramaan.gov.in/  या संकेतस्थळावर जा


 बायोमॅट्रिक किंवा ऑथेंटिकेशनच्या (authentication) माध्यमातून ओळख पटवण्यासाठी बोटाचे ठसे द्या
 
पडताळणी केल्यानंतर जीवन प्रमाण पोर्टल नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवावे ज्यात लाइफ सर्टिफिकेट आयडी (Life Certificate ID) मिळेल.


त्यानंतर तुम्ही ईमेल आयडी (Email Id) किंवा अॅपच्या माध्यमातून तुमचं लाईफ सर्टिफिकेट पाठवा 


आवश्यक कागपत्र 


1. आधारल कार्ड (Aadhaar Card)
2. अधिकृत मोबाईल क्रमांक (Mobile Number)
3. बँक खात्याची माहिती (Bank Details)
4. बायोमेट्रिक उपकरणे (Biomatric)
5. इंटरनेट कनेक्टिव्हिटी 
6. पेन्शन मंजूर झाल्याची कागदपत्रे


 डिजिटल लाइफ सर्टिफिकेट नाकारण्याची 2 कारणं 


1. पेन्शनधारकाचं आधार क्रमांक बँकेच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केला नसल्यास, DLC नाकारलं जातं.


2. DLC सबमिट करताना पेन्शनधारकाने चुकीचा खाते क्रमांक प्रदान केल्यास तुम्हाला समस्या निर्माण होते.