Pensioners Life Certificate: आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता केंद्र शासनाकडून आता बरेच असे निर्णय घेतले जात आहेत ज्यांचा थेट परिणाम अनेकांनाच होताना दिसणार आहे. याच निर्णयांच्या रांगेत आता आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. ज्याचा फायदा शारीरिक व्याधी, आजारपण आणि चालण्याफिरण्यास असमर्थ असणाऱ्या पेन्शनधारकांना होणार आहे. कारण, या निर्मयानंतर आता नव्या तरतुदींनुसार या पेन्शनधारकांचं लाइफ सर्ट‍िफ‍िकेट अर्थात हयातीचा दाखला घरूनच जमा केला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय पोस्ट खात्याकडून ही सुविधा उपलब्ध केली जात आहे. दरवर्षी पेन्शनधारकांना 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यानच्या काळात हयातीचा दाखला जमा करावा लागतो. याच पुराव्यामुळं पेन्शनधारकांना पेन्शनची रक्कम दिली जाते. 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या पेन्शनधारकांराठी दाखला जमा करण्याचा कालावधी 1 ऑक्टोबरपासून सुरु झाला आहे. तर, 60 वर्षे ते 80 वर्षे वयातील नागरिकांसाठी हा कालावधी 1 ते 30 नोव्हेंबरदरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. 


दाखला जमा करण्याची प्रक्रिया आणखी सोपी 


भारतीय पोस्ट खात्याकडून सुरु करण्यात आलेल्या सुविधेनुसार आजारपणानं ग्रासलेल्या आणि चालण्याफिरण्यास असमर्थ असणाऱ्या खातेधारकांना पोस्टमनला घरी बोलवून Life Certificate  जमा करण्याची मुभा असेल. इंड‍िया पोस्‍ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि इलेक्‍ट्रॉन‍िक्‍स व सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या वतीनं ही घरपोच सेवा सुरु करण्यात आली आहे. 


नेमकी काय आहे सुविधा, कसा घ्यावा लाभ? 


केंद्राच्या वतीनं पेन्शनधारकांना त्यांच्या घरापर्यंत ही सुविधा पुरवण्यासाठी सध्या शहरी आणि ग्रामीण टपाल खात्याची मदत घेतली जात आहे. जिथं पेन्शनधारकांनी निवेदन दिल्यानंतर जवळील पोस्टातून पोस्टमन त्यांच्या घरी येऊन  ड‍िज‍िटल लाइफ सर्ट‍िफ‍िकेट जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करेल. ज्येष्ठ नागरिकांसमवेत दिव्यांग पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 


हेसुद्धा वाचा : Navratri 2023 : छत्रपतीही आई भवानीच्या भक्तीत तल्लीन! संभाजी राजांच्या शाही नवरात्रोत्सवाचे खास फोटो पाहिले का?


पोस्टाकडून ही सुविधा मिळवण्यासाठी इंड‍िया पोस्‍ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून पोस्टमनला घरी बोलवण्यासाठी एक विनंती जारी करावी लागणार आहे. मोबाईल अॅपनं या सुविधेचा फायदा घेण्यासाठी पेंशनर postinfo app डाऊनलोड करावं. यामध्ये आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक किंवा पोस्ट खातं अशी माहिती द्यावी. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांना 70 रुपये इतर सेवाशुल्कही भरावं लागणार आहे.