Couple in forest : पावसामुळे निसर्ग हिरवगार झालं आहे. डोंगर आणि जंगल परिसरात झाडेझुडपे बहरले आहेत. अशात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी प्रेमी युगुल वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. पण एका निसर्गाच्या सान्निध्यात जंगलात रोमान्स करणं महाग पडलं आहे. जंगलात ते दोघे एकमेकांसोबत रोमान्स करत असताना तिथे काही तरुण आले आणि त्यांनी त्यांचासोबत गैरवर्तन केलं. एवढंच नाही तर या कपलचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.  (people caught girlfriend boyfriend Romance in forest couple video viral on Social media trending news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते दोघे जंगलाच्या दिशेने जात असताना गावातील काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर ते दोघे जगंलातील निर्जन ठिकाणी झुडपात एकमेकांच्या शेजारी बसून प्रेम करत असताना तिथे ते तरुण आणले. त्यांना पाहून प्रियकर आणि प्रेयसीने तिथून पळ काढला. मात्र त्या तरुणांनी त्यांना गाठलं. 


त्यानंतर त्यांनी त्या कपलचा व्हिडीओ काढला आणि त्यांना बेदम मारहाण केली. तरुणीसोबत गैरवर्तन करत असताना तरुण त्यांना विनंती करत होता,... ''तरुणीला सोडा, तुम्हाला जे करायचं आहे ते माझ्यासोबत करा.'' 


हा धक्कादायक प्रकार बिहारच्या जमुई जिल्ह्यातील आहे.  या जिल्ह्यातील लक्ष्मीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोहबरवा जंगलातील हा सगळ्या प्रकार आहे. त्या समाजकंटानी त्या दोघांचे लग्न लावून देण्याचेही बोललं. मात्र तरुणाने माफी मागितल्यावर कसेबसे ते कपल तिथून निसटलं. 


तरुण आणि तरुणीमध्ये दोन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होत, अशी माहिती मिळाली आहे. शनिवारी हे कपल प्रेयसीला दुचाकीवरुन लक्ष्मीपूरच्या गंगटा जंगलात गेले होते. तो तरुण त्या लोकांना गयावया करत होता माझ्या प्रेयसीला काहीही करु नका आणि बोलू नका. मात्र त्या तरुणांनी तरुणीच्या चेहऱ्यावरील मास्कही काढताना या व्हिडीओमध्ये दिसून आलं. 


हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वत्र या घटनेची चर्चा सुरु आहे. दरम्यान या व्हिडीओची दखल पोलिसांनी घेतली असून समाजकंटकांना कारवाई करण्याचं सांगितलं आहे. त्याशिवाय त्या तरुणीन आणि तरुणाने पोलिसांकडे एफआयआर दाखल केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. 


अशा प्रकारच्या घटना या नवीन नाही. यापूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. समाजकंटकाकडून प्रेमी युगुलाना मारहाण आणि तरुणींसोबत गैरवर्तणुकीच्या घटना घडल्या आहेत.