मुंबई : 1.38 अब्ज लोकसंख्येसह भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला देशात इंटरनेटचा वापर आणि युझर्सची संख्या देखील जास्त असणारत. NFHS म्हणजेच नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 च्या अहवालानुसार, जानेवारी 2022 मध्ये भारतात 626 मिलियन लोकांची इंटरनेट युझर्स म्हणून नोंद झाली, म्हणजेच भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 47 टक्के लोकं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IAMAI Kantar ICUBE 2020 च्या अहवालानुसार, भारतात प्रति युझर प्रति महिना डेटाचा वापर 17 GB पर्यंत पोहोचला आहे. भारतात गेल्या पाच वर्षांत भारतीयांकडून किती डेटा वापरला जातो आणि भारतातील सर्वाधिक इंटरनेट युझर कोणत्या राज्यात आहेत याची माहिती घेण्यात आली आहे.


सर्वाधिक इंटरनेट एक्टिव्ह युझर्स असलेली टॉप 3 राज्यं


IAMAI Kantar ICUBE 2020 च्या अहवालानुसार, राज्य पातळीवर, महाराष्ट्रात एक्टिव्ह इंटरनेटचा सर्वाधिक वापर आहे. त्यापाठोपाठ गोवा आणि केरळचा क्रमांक लागतो. तर कमी इंटरनेट वापराच्या बाबतीत बिहार पहिल्या क्रमांकावर आहे.


अहवालानुसार असंही समोर आलंय की, भारतातील लोकं दररोज 8 तासांपेक्षा जास्त वेळ इंटरनेटवर घालवत आहेत. तर 90 टक्के लोक इंटरनेटवर सर्च पाहण्यासाठी त्यांची स्थानिक भाषा वापरण्यास प्राधान्य देतात. 


निल्सनच्या सर्वेक्षणानुसार, 90 टक्के युझर्स दररोज इंटरनेट वापरतात. 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोकंही इंटरनेट वापरण्यात मागे नाहीत. या वयोगटातील 81 टक्के लोकांनी हे मान्य केलं की, ते इंटरनेट वापरतात.