नवी दिल्ली : रिलायन्स जिओबरोबरच्या करारानंतर अनिल अंबानींच्या परिस्थितीत सुधारणा


रिलायन्स जिओबरोबरचा करार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिकडेच अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने आपला मोबाईल व्यवसाय मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला विकला. रिलायन्स कम्युनिकेशन्सने रिलायन्स जिओबरोबर २४,००० कोटींचा करार केला आहे. यामुळे अनिल अंबानींच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे.


खडतर काळ


गेले काही वर्षं सातत्याने येत असलेल्या व्यावसायिक अपयशामुळे अनिल अंबानी अडचणीत आले होते. त्यांचं श्रीमंतांच्या यादीतलं स्थानही घसरलं होतं. त्यांच्या गृपची बाजारातली पतसुद्धा घसरली आहे. त्यामुळे गेली काही वर्ष ही अनिल अंबानींसाठी अत्यंत अडचणीची होती. त्यांच्या आयुष्यातला हा सर्वात पडता काळ आहे.


२जीचे आरोप


त्यातच २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातसुद्धा अनिल अंबानींवर आरोप ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांची प्रतिमासुद्धा मलीन झाली होती. परंतु जुनं वर्ष संपता संपता त्यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. यामुळे त्याचा मोठाच दिलासा मिळाला आहे. 


माणसांची पारख


या सगळ्या वातावरणात अनेक लोकांनी अनिल अंबानीशी संबंध तोडले होते. या काळात फारच थोडे लोक माझ्यासोबत उभे होते. इतकंच काय लोक माझा फोन कॉलसुद्धा टाळत होते. या काळात मला खरोखरंच कोण कोण माझ्यासोबत आहेत याची मला जाणीव झाली, असं अनिल अंबानी यांनी ईकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. आता मी श्रीमंतही नाही आणि प्रसिद्धही नाही, मी एक सर्वसाधारण माणूस, असंही ते म्हणाले.