तिरुअनंतपुरम : केरळमध्ये कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. राज्यात मंगळवारी 67 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे केरळमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या 963 झाली असून 415 जणांवर उपचार सुरु आहेत. या दरम्यान केरळ सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जे लोक परदेशातून केरळमध्ये येत आहेत, त्यांच्याकडून क्वारंटाईन होण्यासाठी पैसे घेण्यात येणार आहेत. त्याशिवाय देशातील विविध भागातून केरळमध्ये आलेले जे लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये राहणार, त्यांनादेखील क्वारंटाईनसाठीचे पैसे आकारण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी मंगळवारी याबाबत माहिती देताना सांगितलं की, 'लाखोंच्या संख्येने लोक केरळ राज्यात परत येत आहेत. बाहेरुन आलेले जे लोक संस्थात्मक क्वारंटाईन होतील त्यांना पैसे भरावे लागणार आहेत. सरकार एकट्याने या सर्वांचा खर्च उचलण्यासाठी सक्षम नाही. हा नियम सर्वांसाठी लागू नाही. परंतु परदेशातून येणाऱ्या सर्वांसाठी हा नियम लागू असणार आहे.'


राज्य सरकारकडून पैसे भरण्यासाठी काही श्रेणी तयार केल्या जातील. यासाठी कमीत कमी पैसे आकारण्यात येणार असल्याचं, विजयन यांनी सांगितलं.


'योग्य काळजी घेतली तर कोरोना ८ दिवसांत बरा होतो'


देशातील अनेक राज्यातून, परदेशातून येणाऱ्या लोकांनी मोठ्या संख्येने केरळ राज्यात येण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. आम्ही परत येणाऱ्या लोकांचं स्वागत करतो, परंतु येथे आल्यानंतर त्यांना क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोक देशातील विविध भागातून केरळमध्ये आले आहेत. तर 11,189 लोक परदेशातून केरळात आले असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


आता गॅस सिलेंडर whatsappवरही बुक करता येणार