नवी दिल्ली : नक्षलवाद्यांच्या विरोधात भारतीय जवानांनी मोठी रणनीती आखली आहे. काश्मीरमध्ये मोस्ट वांटेड दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्याची तयारी केली जात आहे. यासाठी जवानांनी टॉप कमांडर्सची लिस्ट देखील बनवली आहे. छत्तीसगड, उडीसा, झारखंड, तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यात नक्षलवाद्यांचं जाळं पसरलं आहे. नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडर्सची लिस्ट तयार करुन ती सुरक्षा रक्षकांना सोपवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गृह मंत्रालय आणि गुप्तचर विभागाच्या मदतीने नक्षलवाद्यांची ही लिस्ट तयार करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये नक्षलवाद्यांची संपूर्ण माहिती देखील पुरवण्य़ात आली आहे. मोस्ट वांटेड लिस्टमध्ये हिडमा सारख्या नक्षलवाद्याचा देखील समावेश आहे. हिडमावर 12 जवानांच्या हत्येचा आरोप आहे. छत्तीसगडमधील दरभा घाटात 75 जवानांच्या हत्येचा आरोप असलेल्या नक्षलवाद्यांचा देखील या यादीत समावेश आहे. 



गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या मते, नक्षलवादी कधीच एका ठिकाणी जास्त काळ नाही थांबत. ते प्रत्येक वेळी आपली जागा बदलत असतात. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवणं कठीण आहे. काही नक्षलवाद्यांचे फोटो देखील पोलिसांकडे नाही. त्यामुळे त्यांची ओळख पटवणं देखील कठीण असतं.