मुंबई : देशातील नागरिकांसाठी सध्या सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्ड होय. त्याशिवाय सरकारी कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. आधार कार्डबाबत UIDAI ने नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी नागरिकांना सूचित केले आहे की, एका क्रमांकावर कॉल करून आधार कार्ड संबधीत कोणत्याही अडचणी दुर करू शकतात. UIDAI च्या वतीने हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

12 भाषांमध्ये क्रमांक उपलब्ध
जर तुम्हाला आधार कार्डशी संबधित काही अडचणी असतील तर तुम्ही 1947 वर कॉल करून त्या सोडवू शकता. या नंबरवर कॉल करून आरामात सर्व अडचणी दूर होऊ शकतात. हा क्रमांक साधारण 12 भाषांमध्ये काम करतो. कोणत्याही राज्यातील नागरिक या क्रमांकावर कॉल करून संवाद साधू शकतात.


या भाषांमध्ये करू शकता संवाद
या क्रमांकावर तुम्ही हिंदी, इंग्रजी, तेलुगू, कन्नड, तामिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामिया आणि ऊर्दूमध्ये संवाद साधू शकता. UIDAI ने केलेल्या ट्विटनुसार 1947 क्रमांक डायल करून तुम्ही आपल्या आवडीच्या संवाद भाषेची निवड करू शकता.


कॉल करण्यासाठी कोणातेही शुल्क नाही
हा क्रमांक पूर्णतः निशुल्क आहे. याचा अर्थ या क्रमांकावर कॉल करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. तुम्हाला असलेल्या अडचणींसाठी या क्रमांकावर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी कॉल करू शकता. तसेच रविवारी ही सेवा सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.