मुंबई  : एखाद्या व्यक्तीला पैशाची गरज पडली आणि कोणत्याही इतर सोर्सकडून पैसे मिळत नसल्यास, पर्सनल लोन घ्यावे लागते. आताच्या डिजिटल युगात पर्सनल लोन मिळणे देखील सोपं होतंय. त्यासाठी तुमचा क्रेडीट स्कोअर खराब असायला नको एव्हढंच. बँक आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांपासून पर्सनल लोन घेता येते. तुम्हाला कमी व्याजदरात 40 लाखापर्यंतच्या पर्सनल लोनची गरज असेल तर, सध्या 12 अशा वित्तसंस्था आहेत जेथे कमी व्याजदरात पर्सनल लोन मिळू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SBI आणि HSBC बँक
भारतीय स्टेट बँकेतून 20 लाखापर्यंतच्या पर्सनल लोनसाठी व्याजदर 9.6 ते 13.85 टक्के वार्षिक इतका आहे. HSBC बँकेत 30 लाखापर्यंतचे लोन 9.5 ते 15 टक्क्यांपर्यंत वर्षिक व्याजदराने उपलब्ध होते.


सिटी बँक आणि बँक ऑफ बडोदा (City Bank, Bank of badoda)
सिटी बँकेतून 9.9 ते 16.49 टक्के वार्षिक व्याजदरांवर 50 हजारांपासून ते 30 लाखांपर्यंत पर्सनल लोन मिळू शकते. बॅक ऑफ बडोदा 50 हजारापासून ते 10 लाख रुपयांपर्यंत 10 ते 15.60 टक्के वार्षिक लोन देत असते.


फेडरल बँक आणि IDFC फर्स्ट बँक
फेडरल बँकेत 25 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन 10.49 ते 17.99 टक्के वार्षिक व्याजदरावर मिळू शकते. तसेच IDFC फर्स्ट बँकेत 40 लाखांपर्यंतचे लोन 10.49 टक्के वार्षिक व्याजदरांमध्ये मिळते.


HDFC आणि ICICI बँक
या दोन्ही खासगी क्षेत्रातील बँका आहेत. एचडीएफसीमध्ये 50 हजारापासून ते 40 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन 10.50 टक्के ते 21 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याजदरांने मिळू शकते. ICICI बँकेत 25 लाखांपर्यंतचे लोन 10.50 ते 19 टक्क्यांपर्यत वार्षिक व्याजदराने मिळू शकते.


कोटक महिंद्रा आणि टाटा कॅपिटल (kotak mahindra , tata capital)
कोटक महिंद्रा बँकेत 50 हजारापासून ते 20 लाखापर्यंतचे लोन 10.57 ते 24 टक्क्यांपर्यत  वार्षिक व्याजदरांवर मिळू शकते. टाटा कॅपिटल ही एक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे येथे 75 हजारांपासून ते 25 लाखांपर्यंतचे पर्सनल लोनवर व्याज 10.99 टक्के वार्षिक व्याजदराने मिळू शकते.


एक्सिस आणि बजाज फिनसर्व (Axis bank, Bajaj finsev)
एक्सिस बँकेत 12 तेस 21 टक्के वार्षिक व्याजदराने 50 हजार ते 15 लाखापर्यंत लोन घेता येते. बजाज फिनसर्वमध्ये 25 लाखापर्यंतचे लोन 13 टक्के वार्षिक व्याजदरांनुसार मिळू शकते. 


संबधित आकडे 30 जून 2021 पर्यंतच्या माहितीवर आधारीत आहेत.