मुंबई : रविवारी देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर लागोपाठ आठव्या दिवशी वाढले आहे. रुपयाची घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेल महागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, रविवारी दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्य़े पेट्रोलचा दर 16 पैशांनी वाढला. चेन्नईमध्ये 17 पैसे प्रति लीटर मागे वाढ झाली. डिझेल दिल्ली आणि कोलकातामध्ये 34 पैशांनी महागलं तर चेन्नईमध्ये 36 पैशांची वाढ झाली. 


रविवारी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव 78.84 रुपये, कोलकातामध्ये 81.76 रुपये तर मुंबईत 86.25 रुपये झाला. रविवारी या मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल सर्वाधिक स्तरावर गेलं. रविवारी मुंबईत देखील पेट्रोलने रेकॉर्ड मोडला. 


डिझेलचा दर दिल्लीमध्ये 70.76 रुपये, कोलकातामध्ये 73.61 रुपये, मुंबईमध्ये 75.12 रुपये आणि चेन्नईमध्ये 74.77 रुपये प्रति लीटर झाला. मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल 70 डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूडचा दर 78 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं.