Petrol and Diesel Latest Price 1 aujust: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने चढउतार जाणवत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 0.14 डॉलरने खाली येऊन प्रति बॅरल 81.66 डॉलरला विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ऑईल 0.57 डॉलरने वाढून प्रति बॅरल 85.56 डॉलरला विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन (Petrol and Diesel Price) दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीत काही दिलासा मिळाला आहे का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष्य आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेल कंपन्यांनी ऑगस्टच्या पहिल्या दिवशी तेलाच्या किमती अपडेट केल्या आहेत. सोमवारी व्यवहार संपल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. कच्च्या तेलाच्या दरात वाढ होऊनही आज तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर स्थिर आहेत.


देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. 1 ऑगस्टलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. 15 ऑगस्टलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. 22 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 15 रुपयांपर्यंत खाली आणले जातील. पण हे नक्की कधी होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.


दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 प्रति लिटर आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 तर डिझेलचा दर 94.27 प्रतिलिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 102.63 तर डिझेलचा दर 94.24 प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 प्रति लिटर आहे.