नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत गुरूवारी पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सहा दिवसांच्या दरवाढीनंतर काल (बुधवारी) पेट्रोलच्या किंमतीत किंचितशा घसरण पाहायला मिळत होती. पण हा आनंद एका दिवसापुरताच मर्यादीत राहीला. आज मुंबईमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 14 पैशांनी वाढ झाली आहे. बुधवारी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती घसरल्या तर डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ पाहायला मिळत होती. बुधवारी मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 75,97 प्रति लीटर होती आणि आजच्या दरवाढीनंतर पेट्रोल 76.11 रुपये प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत पुढील काळातही वाढतच राहणार आहेत. याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर पाहायला मिळेल. त्यामुळे भारतातही येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 14 पैसे प्रति लीटर नोंदवली गेली. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल 70.47 रुपये प्रति लीटर मिळत आहे. काल दिल्लीमध्ये पेट्रोल 70.33 रुपये प्रति लीटर दराने मिळत होते. तर डीझेलच्या किंमतीत 19 पैसे प्रती लीटरची वाढ झाल्यानंतर गुरूवारी याची किंमत 67.82 रुपये प्रति लीटर झाली. गेल्या वर्षी २७ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढतच जात असल्याचे पाहायला मिळते आहे. सध्या कच्चे तेल प्रतिपिंप ६० डॉलर एवढ्या किंमतीला विकले जात आहे. जर हिच स्थिती कायम राहिली तर पेट्रोलचे दर प्रतिलिटर २ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.


मंगळवारच्या किंमती


मंगळवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली होती. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये पेट्रोल 28 पैसे तर चेन्नईमध्ये 29 पैसे प्रति लीटरने महाग झाले. डिझेल दिल्ली आणि कोलकातामध्ये 29 पैसे तर मुंबई आणि चेन्नईमध्ये 31 पैसे प्रतिलीटर महाग झाले. मंगळवारी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 70.41 रुपये प्रति लीटर पाहायला होती.