मुंबई : देशभरात सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे भाव घसरले आहेत. पेट्रोल ३० पैसे डिझेल २८ पैसे स्वस्त झालंय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्यानं कमी होत असल्यानं देशांतर्गत तेल कंपन्या दरांमध्ये कपात करत आहेत. 


कच्च्या तेलाचे भाव घसरत असले तरी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण मात्र थांबलेली नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरकपातीला मर्यादा येत आहेत. रुपयाची स्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकरानं गेल्या काही दिवसात अनेक पावलं उचलली आहेत. पण त्याचा परिणाम दिसण्यासाठी किमान महिन्याभराची वाट बघावी लागणार आहे.