Petrol Diesel Rate : गेल्या काही दिवसापासून कच्चा तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्याचा परिणान पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरावर दिसून येतो. तुम्ही जर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गाडीमध्ये पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel rate) भरण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. दरम्यान ओपेक प्लस देशांच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती.  मात्र, पुन्हा एकदा भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात परिणाम दिसून आला आहे. 


क्रूडच्या किमतीत वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या क्रूडच्या किमतीत थोडीशी घसरण झाली असली तरी एप्रिल महिन्यात त्यात सुमारे आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी व्यापारात ब्रेंट क्रूड $ 0.04 किंवा 0.05 टक्क्यांनी कमी होऊन प्रति बॅरल $ 86.27 वर व्यापार करत आहे. त्याचप्रमाणे WTI क्रूड देखील $0.06 म्हणजेच 0.07 टक्क्यांनी घसरून $82.46 प्रति बॅरल आहे. गेल्या वर्षी मार्च 2022 कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचली होती. जी रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर 2008 नंतरची सर्वोच्च पातळी होती.


तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर 


दरम्यान मे 2022 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol Diesel Price) उत्पादन शुल्क कमी केले. त्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये आणि कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या खाली आली होती, तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची आशा होती. मात्र पुन्हा एकदा कच्च्या तेलाने प्रति बॅरल 85 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. 


शहर   पेट्रोल रु/लिट  डिझेल रु/लि
दिल्ली  96.72  89.62
मुंबई  106.31  94.27
कोलकाता  106.03  92.76
चेन्नई  102.63  94.24
नोएडा  96.79  89.96
लखनऊ  96.57  89.76
जयपूर  108.48  93.72
पाटणा  107.24  94.04
भोपाळ  108.65  93.90
चंदीगड  96.20  84.216
रांची  99.84  94.65
भोपाळ  108.65  93.90
गांधीनगर  96.63  92.38
बंगलोर  101.94  87.89
गुरुग्राम  97.18  90.05 

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.


घरबसल्या चेक करा नवे  दर 


तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.