Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol and Diesel Price) अनेक दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही, मात्र आता सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही. नियमित किमती कायम आहेत. किमती कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. त्यामुळे लवकरच इंधनाच्या किमती कमी केल्या जातील. तज्ज्ञांच्या मते लवकरच किमती 10 टक्क्यांनी म्हणजेच 14 रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.


पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्च्या तेलाच्या किमती घटल्याने पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर 14 रुपयांनी कमी होण्याचा अंदाज आहे. मे महिन्यानंतर प्रथमच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 81 डॉलरवर आल्या आहेत. अमेरिकी क्रुड तेलाचा सरासरी भाव प्रति बॅरल 74 डॉलर झाला आहे. कच्च्या तेलाच्या म्हणजे ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती भारतीय रिफायनरीसाठी सरासरी प्रति बॅरल 82 डॉलरवर आल्या आहेत.


ब्रेंट क्रूड जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता असून , जानेवारीची पातळी गाठली आहे. तज्ज्ञांच्या मते, यावेळी ब्रेंट क्रूडची किंमत सातत्याने घसरत आहेत. त्यामुळ त्याचबरोबर या काळात देशांतर्गत तेलाच्या किमतीत कोणतीही कपात झालेली नाही, त्यामुळे लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होईल, असे मानले जात आहे. 


कच्च्या तेलाची किमतीत घसरण


सध्या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल  85 डॉलरच्या जवळ आहे. त्याच वेळी, WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल   78 डॉलरच्या पातळीवर आली आहे. त्याच वेळी, वर्षाच्या सुरुवातीला कच्च्या तेलाची किंमत $150 च्या पातळीवर पोहोचली होती आणि आज ती  85 डॉलर ते  75 डॉलरच्या दरम्यान  ट्रेड करत आहे. 
 
दरम्यान, मार्चमध्ये त्याची किंमत प्रति बॅरल 112.8 डॉलर होती. यानुसार, गेल्या आठ महिन्यात भारतीय रिफायनरी कंपन्यांसाठी कच्च्या तेलाच्या किमती ३१ डॉलरनी म्हणजेच जवळपास 27 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. प्रति बॅरल एक डॉलरची घट झाल्यास भारतीय कंपन्यांना लिटरमागे 45 पैशांची बचत होते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लिटर 14 रुपयांनी कमी होऊ शकतात, मात्र ही कपाच एकाचवेळी होण्याची शक्यता नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


कच्च्या तेलाची किंमत,रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलरचा दर, केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जमा केलेले कर आणि देशातील इंधनाची मागणी यावर देशातील पेट्रोल, डिझेलचे दर अवलंबून असतात. आपल्या देशात ८५ टक्के कच्चे तेल आयात केले जाते. २०१४ पासून तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात.